मानव विकास एस. टी. बसला अपघात

2

अरुणा प्रकल्पानजिक घडली घटना; सुदैवाने जीवितहानी टळली

वैभववाडी, ता. २१ : मौदेहून वैभववाडीला येणाऱ्या मानव विकास एस. टी. बसला अरुणा प्रकल्पा दरम्यान एका तीव्र वळणावर अपघात झाला. मात्र या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा अपघात शनिवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
शनिवारी दुपारी वैभववाडीहून शालेय विद्यार्थ्यांना मौदेला घेऊन जाणारी मानव विकास एस. टी. बस मौदेहून वैभववाडीला येत असताना अरुणा प्रकल्पा दरम्यान एका तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटून गटारात जावून कलंडली. या बसमध्ये दोन ते तीन प्रवासी होते. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

11

4