Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सिंधुदुर्गनगरी ता.२1: कुडाळ एमआयडीसी येथे 3 किलो 48 ग्रॅम वजनाचा गांजा रविवारी स्थानिक गुन्हा अन्वेषणने जप्त केला. याप्रकरणी कुडाळ रेल्वेस्टेशन जवळील सईद कादर शेख ( वय 38) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हा अन्वेषणचे उपनिरीक्षक रविराज फडणवीस यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याच नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. एमआयडीसी आईस फॅक्टरी जवळील तिठयावर मोटर सायकलच्या हॅण्डलला लाल पांढऱ्या पिशवितुन जप्त केलेला गांजा सईद शेख घेवून आला होता. याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Download WordPress Themes Nulled and plugins.