नगराध्यक्ष साळगावकरांकडून कौतुक:पोलिसांच्या अनोख्या कल्पनेमुळे वाहतूक कोंडी नाही…
आंबोली ता.२१: पोलीस प्रशासनाने ठरवले तर कोणतीही गोष्ट व्यवस्थितरीत्या होऊ शकते याचे उदाहरण आज आंबोलीत अनुभवतात आले.सिंधुदुर्ग पोलीसांनी योग्य पद्धतीने बंदोबस्त ठेवल्याने शिस्तबद्ध पार्किंग पर्यटक आणि पर्यटन याचा लाभ लाखो पर्यटकांना घेता आला.दरम्यान त्यांच्या अनोख्या कामगिरीबद्दल सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी खास त्या ठिकाणी जाऊन पोलीस कर्मचार्यांचे कौतुक केले व अशाच प्रकारे रविवार-शनिवार बंदोबस्त ठेवल्यास कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आज या ठिकाणी सुमारे दीड ते दोन लाखांपर्यंत पर्यटकांनी हजेरी लावली होती एरव्ही दोन्ही बाजूंनी गाड्यांच्या रांगा जागा दिसते मात्र त्या ठिकाणी ड्युटी बजावत असलेल्या सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या कर्मचारी चेक पोस्ट परिसरात गाड्या पार्किंग करून ठेवत पर्यटकांना पायी मुख्य धबधब्याच्या ठिकाणी पाठविले त्यामुळे दर वर्षी मुख्य धबधबा ते बाजारपेठ अशी होणारी वाहतूक कोंडी यामुळे सुटली तर चेक पोस्ट पासून हॉटेल पर्यंत बेळगाव कर्नाटक मधून येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्यांच्या रांगाच रांगा दिसत होतं त्यांना योग्य पद्धतीने पार्किंग उपलब्ध करून देत पुन्हा सगळे पाठविण्याच्या प्रयत्न पोलीस करताना योग्य पद्धतीने पार्किंगची अंमलबजावणी झाल्यास कोणताही अनुचित प्रकार घडला नाही तर वाहतूक कोंडीच्या समस्या सुद्धा जाणवल्या नाहीत त्यामुळे श्री साळगावकर यांनी आंबोलीत जाऊन पोलीस दलाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले त्याची माहिती त्यांनी ब्रेकिंग मालवणीला दिली अशाप्रकारे सातत्य राहिल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला