…अखेर चंद्रयान-२ चे प्रक्षेपण आज दुपारी २:०० वाजता…

2

इस्त्रोची माहिती; १५ जुलैला होणार होते प्रक्षेपण…

मुंबई ता.२२: भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या चंद्रयान-२ चे प्रक्षेपण आज दुपारी २:०० वाजता होणार आहे.तर या मोहिमेला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.त्यामुळे सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे.
हे प्रक्षेपण १५ जुलैला होणार होते.मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे प्रक्षेपणाच्या अवघ्या ५६ मिनिटां आधी उड्डाण रद्द करण्यात आले होते.त्यामुळे ही मोहीम रखडली होती.आता तांत्रिक बिघाड पूर्णपणे दुरुस्त झाल्यामुळे पुन्हा एकदा ही मोहीम प्रक्षेपणासाठी सज्ज झाल्याची माहिती इस्त्रो कडून देण्यात आली आहे.

0

4