महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात चर्चा: संजू परब,सतीश सावंतांचे नाव आघाडीवर
सावंतवाडी/शुभम धुरी ता.२२: मालवण मधून माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि कणकवलीतून विद्यमान आमदार नितेश राणे अशी दोन नावे ठरलेली असताना सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून नेमके कोण याची चर्चा सध्यस्थितीत पक्षात जोरदार सुरू आहे.दरम्यान या ठीकाणी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या विरोधात लढण्यासाठी तसाच चेहरा आवश्यक आहे.त्यामुळे आमदारकीचे तिकीट इच्छुक असलेल्या तालुकाध्यक्ष संजू परब यांना की जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांना संधी मिळते याकडे सर्वाचे लक्ष लागून राहीले आहेत.
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत यात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने दोन दिवसापुर्वी कुडाळ तालुक्यात झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात खुद्द आमदार नितेश राणे यांनी त्या ठीकाणी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री नारायण राणे हेच निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.असे जाहीर करून त्या ठीकाणी सुरू असलेल्या चर्चेला पुर्ण विराम दिला.तर दुसरीकडे कणकवली विधानसभा मतदार संघातून आमदार राणे हेच निवडणूकीला सामोरे जाणार आहेत हे यापुर्वीच ठरले आहे.त्यामुळे आता सावंतवाडी विधानसभा निवडणुकीत नेमकी कोणाला संधी मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सदयस्थिती लक्षात घेता या मतदार संघात तालुकाध्यक्ष संजू परब यांचे नाव चर्चेत आहे.सावंतवाडी त्यांनाच संधी देण्यात यावी असा ठराव तालुका कार्यकारीणीत घेण्यात आला होता.तर दुसरीकडे गेले काही दिवस जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी आपल्याला विधानसभा लढवायची आहे,असे जाहीर वक्तव्य केले होते.त्यामुळे ते सुध्दा इच्छुक आहेत.तर तिसरीकडे वेगुर्ल्याचे तालुकाध्यक्ष मनिष दळवी हे सुध्दा या ठीकाणी इच्छुक आहेत.त्यामुळे या सर्वाचा विचार करता आता नेमकी कोणाला पक्षाचे तिकीट मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे .दरम्यान विधानसभा निवडणुका सप्टेंबर महीन्यात होण्याची शक्यता आहे.त्यामुळे या ठीकाणी विदयमान आमदार तथा राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी तशाच सक्षम चेहर्यांची गरज आहे.हे तिघे सोडले तर तसा ताकदीचा चेहरा तुर्तास तरी पक्षाकडे नाही.तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या ठीकाणी काम करणे सोपे जावे यासाठी इतक्यातच नाव जाहीर होणे गरजेचे आहे.असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी नेमके कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात,हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.