संकेश्वर बांदा महामार्गा बाबत लवकर अधिकाऱ्यांशी बैठक

2

नारायण राणेंचे आश्वासन:दाणोली येथील साटम महाराजांचे घेतले दर्शन

सावंतवाडी 
संकेश्वर बांदा महामार्गामुळे आम्ही विस्थापित होणार आहोत मात्र यावर केंद्र शासनाने आमची कमीत कमी जमीन रस्ते महामार्गासाठी घ्यावी जर मोठ्या प्रमाणात जमिनी संपादन केल्या तर आम्ही जायचे कुठे त्यामुळे आपण यात लक्ष घालावा अशी मागणी दाणोली परिसरातील ग्रामस्थांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे केली.
यावेळी मंत्री राणे यांनी आपण लवकरच महामार्ग अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुवर्णमध्ये काढू असे आश्वासन ग्रामस्थांना दिले  मंत्री राणे हे शनिवारी दुपारी दाणोली येथील साटम महाराज मंदिरा आले असता त्यांची परिसरातील ग्रामस्थांनी भेट घेतली यावेळी  नीलम राणे, माजी नगराध्यक्ष संजू परब, मनोज नाईक, रवींद्र मडगावकर, बाळू शिरसाठ, विनोद सावंत आदी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
संकेश्वर बांदा महामार्ग नेमका कुठून जाणार हे अद्याप निश्चित नाही मात्र दाणोली येथील काही घरे महामार्गामुळे विस्थापित होणार आहेत हे निश्चित मानले जाते त्यामुळे येथील ग्रामस्थांनी मंत्री राणे यांच्याकडे आपली कैफियत मांडली एक तर दाणोली बाजारपेठेत पुढे आणि मागे भूसंपादन करण्यासाठी जागाच कमी आहे.
त्यात आमची घरे दुकाने हा सर्व विचार करून या महामार्गासाठी जागा संपादन करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली त्यावर राणे आणि मी स्वतः या प्रश्नात लक्ष घालेन आणि कमीत कमी जागा भूसंपादन कशी होईल या बाबत अधिकाऱ्यांना बोलेन असे आश्वासन दिले तसेच तेथील महिलांनी रोजगारासाठी काहि तरी अशी मागणी केली यावर राणे यांनी लवकरच लघू सुक्ष्म मध्यम  खात्याचे अधिकारी आपल्याकडे येतील त्यांना तुम्ही कोणताही रोजगार करणार ते सांगा निश्चितच तसा रोजगार उपलब्ध करून देण्यात येईल असे स्पष्ट केले.
मंत्री राणे हे खाजगी दौऱ्यानिमित्त सपत्नीक दाणोली येथील साटम महाराज मंदिरात आले होते.यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी विविध विषयांवर चर्चा केली.ग्रामस्थांनी राणे याचे स्वागत केले.

303

4