Thursday, December 12, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामहाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पंच शिबिर १०-११ऑगस्ट रोजी...

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पंच शिबिर १०-११ऑगस्ट रोजी…

सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन आणि मालवण कबड्डी असोसिएशन यांचे आयोजन…

मालवण ता.२२: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने घेण्यात येणार वार्षिक राज्यस्तरीय पंच शिबिर यावर्षी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन आणि मालवण तालुका कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील चिवला बीच परिसरातील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मध्ये १० व ११ ऑगस्ट रोजी संपन्न होणार आहे.या दोन दिवसीय शिबिराचा लाभ महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनशी संलग्न असलेल्या २५ जिल्‍ह्यातील प्रत्येकी २ असा एकूण ५० राज्य ,राष्ट्रीय पंचांना मिळणार आहे .
हे शिबिर महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन चे प्रमुख सरकार्यवाह आस्वाद पाटील,राज्य पंचमंडळ अध्यक्ष रमेश हरियाण ,राज्य पंच मंडळ सचिव श्री दत्ता झिंजुर्डे, राज्य पंचमंडळ सदस्य व सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे कार्यवाह दिनेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच होत असलेल्या या राज्य पंच शिबिराचे आयोजन आदर्शवत व्हावे यासाठी नुकतीच नियोजनाची बैठक सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे उपाध्यक्ष रुजारीओ पिंटो यांच्या अध्यक्षतेखाली चिवला बीच येथे घेण्यात आली.
यावेळी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे कार्यवाह दिनेश चव्हाण, सहकार्यवाह शैलेश नाईक, खजिनदार मार्टिन आल्मेडा, मालवण तालुका कबड्डी असोसिएशन चे सचिव श्री रेनॉल्ड बुतेलो, कबड्डी प्रशिक्षक श्री मंदार ओरसकर, जिल्हा पंच मंडळ सदस्य नितिन हडकर, ज्येष्ठ कबड्डीपटू श्री सौगंधराज बांदेकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यातील पहिलेच राज्य पंच शिबिर पर्यटन स्थळ म्हणून सुप्रसिद्धअसलेल्या मालवण मध्ये होत असल्यामुळे येणाऱ्या सर्वांची निवास व्यवस्था चिवला बीच परिसरातच व्हावी व हा संपूर्ण दोन दिवसाचा कार्यक्रम या निसर्गरम्य पर्यटनस्थळी व्हावा तसेच दोन दिवसाचा पाहुणचारही मालवणी पद्धतीतच व्हावा यासाठी विशेष लक्ष देण्यात यावे असे ठरविण्यात आले शक्य झाल्यास दुसऱ्या दिवसाचे सकाळ चे सत्र समुद्र किनारी योगासनाने सुरु करण्याची जबाबदारी श्री शैलेश नाईक यांनी स्वीकारली. या शिबिरासाठी राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ज्येष्ठ व अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments