शिरोडा रोटरी क्लबच्या वतीने खर्डेवाडी शाळेतील मुलांना छत्र्यांचे वाटप…

2

वेंगुर्ले ता.२२:  रोटरी क्लब ऑफ शिरोडा नेहमीच समाजउपयोगी विविध उपक्रम हाती घेत असते. त्यातलाच एक उपक्रम म्हणून क्लबने शिरोडा येथील पूर्ण प्राथमीक खर्डेवाडी शाळेला भेट देऊन शाळेतील सर्व मुलांना छत्र्यांचे वाटप केले. तसेच शाळेला मदत म्हणून रोख रक्कम दिली.
या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ शिरोडा अध्यक्ष तथा शाळेचा माजी विद्यार्थीअमोल परब,रत्नदीप मालवणकर-सचिव रोटरी क्लब ऑफ शिरोडा, सदस्य राजन शिरोडकर, सचिन गावडे, सुनील मठकर, वकील श्री महाले, ग्रामपंचायत शिरोडा सदस्या मयुरी राऊळ, माजीसदस्य पांडुरंग नाईक, तसेच किरण सावळ-अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, संचिता साळगांवकर-उपाध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती, कीर्ती सावळ-पालक, प्राची बर्डे-पालक, तुलसी जाधव-पालक, अनिल चौहान, किरण मुडशी-मुख्याध्यापक, आरती जोजन-शिक्षिका तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होत. या प्रसंगी मुख्याध्यापक श्री मुडशी यांनी रोटरी क्लब ऑफ शिरोडा यांचे आभार मानले व त्यांना पुढील उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

4