“अर्चना फाउंडेशन’ भंडारी समाजाच्या नेहमी पाठीशी राहील…

2

अर्चना घारे-परब;भंडारी समाजाच्या आयोजित बैठकीत प्रतिपादन…

सावंतवाडी ता.२२: भंडारी समाजाचा इतिहास पराक्रमाचा आणि शौर्याचा आहे.मुळातच लढवय्ये असलेले भंडारी बांधव कष्टाळू आहेत,आपल्या कर्तृत्वावर या समाजातील अनेकांनी विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविला आहे.तळ कोकणचा ईतिहास लिहिताना भंडारी समाजा शिवाय तो पुर्ण होऊ शकत नाही.त्यामुळे अशा कर्तुत्ववान समाजाच्या मागे अर्चना फाउंडेशन नेहमी पाठीशी राहील असा विश्वास पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या उपाध्यक्ष तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निरीक्षक अर्चना घारे- परब यांनी आज येथे दिला.नुकतीच भंडारी समाज महिलांसाठी चालवत असलेल्या वसतीगृहाला त्यांनी भेट दिली.यावेळी भंडारी समाज राबवत असलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
भंडारी समाजाच्या येथिल आयोजित बैठकीत त्यांना मंडळाच्या महिला अध्यक्ष शितल नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना सौ.घारे-परब म्हणाल्या,तळ कोकणचं आणि भंडारी समाजाचे एक अतूट नातं आहे.सावंतवाडी तालुका भंडारी समाज मंडळ राबवत असलेले सामाजिक उपक्रम अतिशय स्तुत्य आणि कौतुकास्पद आहेत.या पुढील काळात भंडारी समाज मंडळाचे पाठीशी उभे राहून राबवत असलेल्या सामाजिक उपक्रमास यथाशक्ती हातभार लावण्याचा प्रयत्न करू”असेही त्यांनी सांगितले.
यावेळी भंडारी समाज मंडळाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, कार्याध्यक्ष प्रा.दिलीप गोडकर ,उपाध्यक्ष गुरूनाथ पेडणेकर , देवीदास आडारकर चंद्रकांत नागवेकर , शंकर साळगावकर, भंडारी पतपेढीचे अध्यक्ष लक्ष्मण धुरी, उपाध्यक्ष गुरूदास पेडणेकर, दिलीप पेडणेकर, चंद्रकांत वाडकर, प्रसाद आरविंदेकर, बाळा आकेरकर, संतोष कासकर, विलास माळगावकर, नामदेव साटेलकर, समता सूर्याजी , श्रध्दा तळेकर, दर्शना पेडणेकर, देवता पेडणेकर, शेखर पेडणेकर, जोशी, कुडव, एकनाथ नारोजी तसेच मंडळाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

1

4