पालिकेच्या वतीने बांधण्यात येणारी स्मशानभूमी शेड दोन महिन्यात पूर्ण करणार…

2

ठेकेदाराचे दोडामार्ग उपनगराध्यक्षांना आश्वासन…

दोडामार्ग ता.२२: येथील नगरपंचायतीच्या वतीने बांधण्यात येत असलेल्या स्मशानभूमीच्या कामात टाळाटाळ होत असल्याचे दिसत असताना आज उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण यानी सदर स्मशान भूमीच्या कामाची पाहणी केली.यावेळी कामाला होत असलेल्याला दिरंगाई बाबत त्यांनी संबंधित ठेकेदाराला जाब विचारला.
या स्मशानभूमीच्या रखडत चाललेल्या कामांमुळे अनेक समस्यांना येथील नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे.त्याला आपण जबाबदार आहात तेव्हा लवकर काम पूर्ण करा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.यावेळी ठेकेदाराने येत्या दोन महिन्यात स्मशानभूमीचे काम पूर्ण करू असे आश्वासन देण्यात आले.

18

4