हिंदू जनजागृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…
सिंधुदुर्गनगरी ता.२२: मौलवी आणि पाद्री यांची एकूण गुन्हेगारी आणि देशविरोधी पार्श्वभूमी पाहता त्यांची सैन्यामध्ये भरती केल्यास देशाची सुरक्षितता आणि एकता धोक्यात येवू शकते. त्यामुळे भारतीय सैन्यात ‘धर्मशिक्षक’ म्हणून मौलवी आणि पाद्री यांची नियुक्ती करण्यात येवू नये अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय संरक्षण मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे.
याबाबतचे निवेदन समितिने जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना सादर केले आहे. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे सुरेश दाभोलकर, संतोष गावडे, शिवसेना कसाल विभाग संघटक डॉ. सुर्यकांत बालम, माजी सैनिक सुधाकर सावंत, जगन्नाथ केरकर, डॉ. अशोक महिंद्रे, गजानन मुंज उपस्थित होते.
भारतीय सैन्यात प्रत्येक वर्षे पंडित, मौलवी आणि पाद्री यांच्यामधुन धर्मशिक्षक म्हणून भरती केली जाते. या पदासाठी निवड केलेल्या युवकांना कनिष्ठ अधिकारी पदाचा दर्जा दिला जातो. यावर्षीही मौलवी आणि पाद्री यांची सैन्याकडून निवड करण्यात येणार आहे. ही निवड होण्यासाठी मुस्लिम विद्यार्थ्यांना मौलवी बनण्याचे प्रशिक्षण मुस्लिम विद्यापीठ देणार आहे. मात्र सद्या देशभरात अनेक घटनांमध्ये मौलवी आणि पाद्री यांचे गुन्हे आणि देशद्रोही स्वरूप उघड होत आहे. मौलवींकडून अनेक देशविघातक आणि देशद्रोही कृत्ये घडत आहेत. तर पाद्रीकडून लैंगिक शोषणासारखे प्रकार घडत आहेत. तसेच देशात मौलवी, मुल्ला, पाद्री, बिशप आदींकडून लैंगिक शोषण, देशविरोधी कारवाया, आतंकवादी कारवाया आणि बलात्कार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे अशा मौलवी आणि पाद्री यांची एकूण गुन्हेगारी आणि देशविरोधी पार्श्वभूमी पाहता त्यांची सैन्यामध्ये भरती केल्यास देशाची सुरक्षितता आणि एकता धोक्यात येवू शकते. त्यामुळे भारतीय सैन्यात ‘धर्मशिक्षक’ म्हणून मौलवी आणि पाद्री यांची नियुक्ती करण्यात येवू नये. तसेच भारतातील सर्व मदरसे आणि चर्च यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केंद्रीय संरक्षण मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे.