आंबोली कावळेसाद हल्ल्यातील “बस” ताब्यात

390
2

सावंतवाडी पोलिसांची माहीती:संशयितांना पकडण्यास होणार फायदा

आंबोली ता.२२: येेथील कावळेसाद परिसरात मालवण येथिल युवकांवर हल्ला करुन त्यांच्याकडे असलेले सुमारे २७  तोळे सोने घेवून पळून गेलेल्या त्या संशयितांपर्यत पोहोचणे आता पोलिसांना सहज झाले आहे त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली गाडी कर्नाटक मधून जप्त करण्यात सावंतवाडी पोलिसांना यश आले आहे .दरम्यान या बसच्या माध्यमातून त्या मारहाणीत असणारे संशयितांपर्यत पोहोचण्यास मदत होणार आहे अशी माहीती या गुन्ह्याचे तपासिक अमंलदार तथा पोलिस उपनिरिक्षक धनंजय चव्हाण यांनी सांगितले
मालवण सुकळवाड येथिल युवकांना कावळेसाद येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या बेळगाव येथिल युवकांनी मारहाण केली होती त्यानंतर तब्बल 27 तोळे सोने चोरून नेले होते या प्रकरणी पंधरा ते वीस जणांवर येथिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता
त्यानुुुसार आज सावंतवाडी पोलिसांना या गुन्ह्यात वापरण्यात आलेली बस आज जप्त केली आहे दरम्यान आवश्यक मुख्य पुरावा मिळाल्यांनतर आता पुढील संशयितांना आम्ही नक्क्कीच अटक करू असा इशारा पोलिसांना दिला आहे
याबाबत पोलिस निरिक्षक श्री चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी जप्त करण्यात यश आले आहे दरम्यान त्या युवकांनी जी गाडी वापरली त्याचे परमिट काढले नव्हते असे त्या गाडी चालकाचे व मालकाचे म्हणणे आहे तरीही नेमके या गाडीत कोण प्रवास करीत होते याची माहीती घेवून संशयितांना अटक करण्यात येणार आहे

4