गांजा बाळगल्या प्रकरणी 25 पर्यंत पोलिस कोठडी

2

सिंधुदुर्गनगरी ता.२२: गांजा बाळगल्या प्रकरणी सईद कादर शेख याला 25 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. जिल्हा विशेष न्यायाधीश आर बी रोटे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली असून सरकारी वकील स्वप्निल सावंत यांनी काम पाहिले.
कुडाळ एमआयडीसी येथे 3 किलो 48 ग्रॅम वजनाचा गांजा रविवारी स्थानिक गुन्हा अन्वेषणने जप्त केला. याप्रकरणी कुडाळ रेल्वेस्टेशन जवळील सईद कादर शेख ( वय 38) याला ताब्यात घेण्यात आले होते.
स्थानिक गुन्हा अन्वेषणचे उपनिरीक्षक रविराज फडणवीस यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याच नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली होती. एमआयडीसी आईस फॅक्टरी जवळील तिठयावर मोटर सायकलच्या हॅण्डलला लाल पांढऱ्या पिशवितुन जप्त केलेला गांजा सईद शेख विक्रीसाठी घेवून आला होता. याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

0

4