रस्त्याचे काम थांबवणारे ते “टोळके” नसून मनसेचे कार्यकर्ते…

162
2

परशुराम उपरकर: दिपक केसरकरांच्या घोषणा म्हणजे वांझोटी चर्चा…

सावंतवाडी ता.२२: पावसाळ्याच्या तोंडावर होणारे आंबोली सावंतवाडी या रस्त्याचे काम थांबवणारे ते टोळके नव्हे तर मनसेचे कार्यकर्ते होते.आम्ही ती जबाबदारी जनतेसाठी स्वीकारतो असे प्रत्युत्तर मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज येथे दिले.पालकमंत्री दीपक केसरकर कोट्यावधीची घोषणा करून वांझोटी चर्चा करत आहे.मात्र त्यात फलित काहीच नाही.ते देत असलेल्या ८०० नोक-यांचे आणि सेट-टाॅप बाॅक्सचे काय झाले असा सवाल सुध्दा त्यांनी यावेळी उपस्थित केला.पालकमंत्री दिपक केसरकर यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात मनसेच्या कार्यकर्त्यांवर “ते टोळके” विकासकामे थांबवत आहेत,अशी नाव न घेता टीका केली होती.या टीकेला उपरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
मनसेचे कार्यकर्ते जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरले होते.पावसाळ्यात जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था होते.तर कोकणातला गणपती दरवर्षी खड्ड्यातूनच आणावा लागतो.त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांवर टोळके असा आरोप करण्यापेक्षा श्री.केसरकर यांनी जिल्ह्यातील रस्त्यांचा दौरा करावा असे यावेळी बोलताना श्री.उपरकर यांनी सांगितले.
यावेळी राजू कासकर आशिष सुभेदार संतोष भैरवकर अतुल केसरकर विठ्ठल गावडे ललित नाईक संकेत शेटकर आदी उपस्थित होते

4