सावंतवाडी शहरात सिग्नल बसविण्याची युवकांकडून मागणी…

597
2

संबंधितांना निवेदन; नगराध्यक्ष साळगावकरांनी केले कौतुक…

सावंतवाडी ता.२२: पर्यटनामुळे शहरातील वाढती रहदारी व अपघाताची संख्या लक्षात घेता येथील रस्त्यावर सिग्नल बसविणे काळाची गरज बनली आहे.त्यामुळे संबंधित प्रशासनांनी याकडे लक्ष घालावे,अशी मागणी येथील काही युवा वर्गाकडून करण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाणे,तहसीलदार तसेच नगरपालिका यांना दिले.दरम्यान या युवकांच्या सामाजिक जाणिवेचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कौतुक केले.
सावंतवाडी शहर पर्यटन दृष्ट्या विकसित होत आहे.त्यामुळे शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.तर प्रवास करताना स्थानिक तसेच पर्यटक वाहनचालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.या धरतीवर शहरात सिग्नल बसवणे आवश्यक आहे.असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.दरम्यान या मागणीचा विचार करू असे आश्वासन श्री.साळगावकर यांनी दिले.

4