अजितदादा पवार म्हणजे परखड नेतृत्व : एम.के.गावडे

2

वेंगुर्लेत शेतकऱ्यांना फळझाडे वाटप करून साजरा केला वाढदिवस

वेंगुर्ले : ता.२२ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणजे परखड नेतृत्व. मंत्रिमंडळात काम करताना नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभे राहून शेतकऱ्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल या साठी नेहमी त्यांचे प्रयत्न असतात. म्हणूनच या लाडक्या नेत्याचा वाढदिवस वेंगुर्लेत शेतकऱ्यांना फळझाडे वाटप करून साजरा करण्यात आला असे प्रतिपादन पक्षाचे प्रांतिक सदस्य एम.के.गावडे यांनी केले.
वेंगुर्लेत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ६० शेतकऱ्यांना काजूची व कल्पवृक्ष वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या संचालिका प्रज्ञा परब, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष नम्रता कुबल, तालुकाध्यक्ष धर्मजी बागकर, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, उपाध्यक्ष योगेश कुबल, माजी जिल्हा बॅंकेच्या संचालक नितीन कुबल, सामाजिक सेल अध्यक्ष वामन कांबळे, ओबीसी सेलचे सावळाराम बोवलेकर, शहर महिलाध्यक्ष सुप्रिया परब, श्रद्धा साटेलकर, युवक अध्यक्ष रोहन वराडकर, सामाजिक अध्यक्ष एकनाथ जाधव, सामाजिक उपाध्यक्ष तात्या तुळस्कर, शेतकरी राजू गवंडे, बाळू सावंत आदी पादाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

4

4