Sunday, December 14, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकारने उडवून दिल्यामुळे गर्भवती महिला पोलीस जखमी...

कारने उडवून दिल्यामुळे गर्भवती महिला पोलीस जखमी…

कोल्हापूर येथील घटना:कारवाई करताना घडला प्रकार…

कोल्हापूर ता.२२: भरधाव वेगाने जाणा-या कार चालकाने ठोकर दिल्यामुळे कोल्हापूर पोलीस ठाण्याची गर्भवती महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली.विद्या निवृत्ती वाळके (वय २८) रा.पोलीस लाईन,कसबा-बावडा असे तिचे नाव आहे.हा प्रकार आज दुपारी येथील चौकात घडला.
दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या तरुणांवर कारवाई करत असताना त्याठिकाणावरून जाणाऱ्या कारचालकाने त्यांना धडक दिली.यात त्या जखमी झाल्या आहेत.दरम्यान त्यांच्यावर येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments