बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश पाटील यांची बदली रद्द

166
2
Google search engine
Google search engine

सरपंच कल्याणकर यांच्या पाठपुराव्याला यश

बांदा ता.२२: बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांची साखरपा (जि. रत्नागिरी) येथे झालेली बदली प्रशासकीय पातळीवर रद्द झाली आहे. मंत्रालयातून बदली आदेश काढण्यात आला आहे. बदली रद्द करण्यासाठी बांदा सरपंच मंदार कल्याणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते.
स्थानिकांच्या मागणीनंतर जिल्हा प्रशासनाने बदलीला स्थगिती दिली होती, तरी बदलीची टांगती तलवार कायम होती. डॉ. पाटील हे सेवाभावी वैद्यकीय अधिकारी म्हणून परिचित आहेत. त्यांनी बांद्यात जनसेवा मानून रुग्णसेवा केल्याने त्यांची बदली रद्द व्हावी यासाठी स्थानिक आग्रही होते. जनतेच्या भावना लक्षात घेता सरपंच कल्याणकर यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन बदली रद्द करण्याची मागणी केली होती. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आज बदली स्थगितीचा आदेश काढण्यात आला. डॉ. पाटील यांची बदली रद्द झाल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.