Thursday, November 7, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यापूर्वा गावडे हिची राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षणासाठी निवड...

पूर्वा गावडे हिची राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षणासाठी निवड…

सिंधुदुर्गनगरी ता.२२: सिंधुदुर्गनगरी क्रीडा संकुल येथील जलतरण तलावातील प्रशिक्षणार्थी व पणदूर हायस्कूलची सहावीची विद्यार्थिनी पूर्वा संदीप गावडे हिची पुणे बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनीमध्ये राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. राज्य क्रीडा व युवक युवा शिवछत्रपती क्रीडापीठ पुणे उपसंचालक यांच्याकडून ही निवड करण्यात आली आहे. याबाबत पूर्वा हीचे सर्वत्र अभिनंदन होत असून जलतरण प्रशिक्षणा बरोबरच तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी ही क्रीडा प्रबोधिनी उचलणार आहे.

पूर्वा हिने आतापर्यंत जिल्हस्तरा बरोबरच राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत यश मिळविलेले आहे. तिने आठ वर्षाची असल्यापासून जलतरण प्रशिक्षणाला प्रारंभ केला होता. त्यानंतर आता तिने महाराष्ट्र राज्या बरोबरच गोवा राज्यातील विविध स्पर्धेत भाग घेत वेळोवेळी यश संपादन केले आहे. मालवण चिवला बिच, वेंगुर्ले निवती बीच व गोवा मडगाव येथे पार पडलेल्या सागरी जलतरण स्पर्धेत सहभाग घेतला होता. निवती येथील राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत ती चौथी आली होती. जलतरण स्पर्धे बरोबरच ती उत्कृष्ट धावपटू आहे. जिल्ह्या बरोबरच गोवा, रत्नागिरी-गुहागर येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत ती सहभागी झाली होती. तारकर्ली येथे झालेल्या कोस्टल मॅरेथॉन स्पर्धेत तिने भाग घेत प्रथम क्रमांक पटकाविला होता. विजयदुर्ग येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला होता. 2017-18 या शैक्षणिक वर्षात संपन्न झालेल्या क्रीडा स्पर्धेत पणदूर हायस्कूलची विद्यार्थिनी म्हणून तिने जलतरण स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ती जिल्हास्तरावर प्रथम, कोल्हापुर विभागीय स्पर्धेत द्वितीय येत राज्य स्तरीय स्पर्धेस पात्र ठरली होती. यासाठी ओरोस जलतरण तलावाचे प्रशिक्षक प्रवीण सुलोकार, निल लब्दे तसेच पणदुर हायस्कूलचे क्रिडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

पुणे बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनी मार्फत जून 2019 मध्ये राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षणासाठी क्रीडा संकुल बालेवाडी येथे निवडचाचणी घेण्यात आली होती. याच निवड चाचणीत तिने दाखविलेल्या कामगिरीच्या जोरावर तिची राष्ट्रीय जलतरण प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments