देवली ग्रामपंचायतीचा आरोग्य शिबिराचा उपक्रम स्तुत्य…

2

जि. प. सदस्य हरी खोबरेकर ; देवलीचा पर्यटनदृष्ट्या विकास करणार…

मालवण, ता. २२ : शहरात आरोग्यविषयक ज्या सुविधा मिळतात त्या ग्रामीण भागातील रुग्णांनाही मिळायला हव्यात या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीने मोफत आरोग्य शिबिराचा राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. देवली गावात पर्यटन कसे येईल आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील यादृष्टीने माझे प्रयत्न सुरू असून देवली गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी देवली येथे केले.
देवली येथे ग्रामपंचायतीच्यावतीने चौदावा वित्त आयोग योजनेतंर्गत खालची देवली प्राथमिक शाळा येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, पंचायत समिती सदस्य मनीषा वराडकर, सरपंच गायत्री चव्हाण, उपसरपंच भाऊ चव्हाण, तंटामुक्त समिती अध्यक्ष गुरुप्रसाद चव्हाण, डॉ. पांडुरंग साईल, डॉ. श्रद्धा साईल, डॉ. संदीप कदम, रामू चव्हाण, अस्मिता देऊलकर, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष शिवदास चव्हाण, माजी सरपंच विजय चव्हाण, हेमंत चव्हाण, वैशाली चव्हाण, पोलिस पाटील श्री. देऊलकर, ग्रामसेविका वेदिका गोसावी, आरोग्यसेवक दुधवडकर, ग्रामपंचायत सदस्य कमलेश गोवेकर, सौ. पालव, आरोग्य व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
देवली ग्रामपंचायतीने शासनाचा निधी गावातील लोकांच्या आरोग्यासाठी खर्च केला ही चांगली बाब आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. ग्रामीण भागात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात असून या शेतकरी वर्गातील महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. त्यामुळेच महिलांसाठी हे आरोग्य शिबिर घेण्यात आले आहे. या शिबिरास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने हे शिबिर घेण्यामागचा उद्देश सफल झाला आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री. परब यांनी यावेळी केले.
या मोफत आरोग्य शिबिरास देवलीवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तपासणी शिबिरात हिमोग्लोबीन, मधुमेह, रक्तदाब इतर तपासणी तसेच नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा १५८ रुग्णांनी लाभ घेतला. ५० लाभार्थ्यांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.

4

4