कणकवलीतून 19 वर्षीय युवती बेपत्ता

285
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.22 ः कणकवली शहरातील माऊलीनगर येथील 19 वर्षाची युवती बेपत्ता झाली आहे. दीपाली जयसिंग चव्हाण असे तिचे नाव आहे. दीपाली ही तालुक्यातील एका वैद्यकीय शिक्षण देणार्‍या संस्थेमध्ये शिक्षण घेत आहे. काल (ता.21) ती सकाळी पावणेआठच्या सुमारास क्लासला जाते असे सांगून बाहेर पडली. मात्र अद्याप ती घरी परतलेली नाही. तिच्या बेपत्ता होण्याबाबतची फिर्याद तिचे वडील जयसिंग शंकर चव्हाण यांनी आज येथील पोलिसात दिली. दीपालीची उंची 5 फूट असून रंग निमगोरा आहे. तिच्या अंगावर गुलाबी रंगाचा पंजाबी कुर्ता आणि हिरवा पायजमा आहे. तिच्याबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.