कॅरम खेळ सर्वांचे भविष्य बदलून टाकणारा ठरेल… बाळासाहेब गोसावी ; रत्नागिरी कॅरम असोसिएशनच्यावतीने हृद्य सत्कार…

2

मालवण, ता. २२ : कॅरम हा खेळ संपूर्ण देशामध्ये तळागाळापर्यंत नेण्याचा मी प्रयत्न करीत आहे. भविष्यातही कॅरम हा खेळ सर्वांचे भविष्य बदलून टाकणारा ठरणार आहे. यापुढेही मी माझ्या परीने या खेळासाठी योगदान देईन. आज तुम्ही जो माझा सन्मान, सत्कार केला तो मी कधीही विसरणार नाही असे प्रतिपादन अखिल भारतीय कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोसावी यांनी रत्नागिरी येथे केले.
मसुरे मेढा गावचे सुपूत्र, अखिल भारतीय कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष, नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा समाजसेवक बाळासाहेब गोसावी यांचा रत्नागिरी येथे आजवरच्या कॅरम आणि समाजसेवेतील कार्याची दखल घेऊन रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन आणि संयोजन समितीच्यावतीने हृद्य सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अजित सावंत, रत्नागिरी कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष श्री. भाटकर, मिलिंद सापते, उद्योजक सुरेंद्र देसाई, रत्नागिरी कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी, राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते.

2

4