एपीजे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेत केंद्रशाळा मसुरे नं.१ चे सुयश…

2

मालवण, ता. २२ : एपीजे अब्दुल कलाम सिंधुदुर्ग प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये मसुरे केंद्र शाळा नं. १ चा इयत्ता सातवीतील विद्यार्थी कु. शिशिर मेहेंदळे याने तालुक्यात द्वीतीय आणि जिल्ह्यात चतुर्थ तर इयत्ता चौथीमधुन कु. ओम चौधरी तालुकास्तरावर द्वीतीय क्रमांक मिळवुन यश मिळविले आहे.
या विद्यार्थ्यांना विनोद कदम, गुरुनाथ ताम्हणकर, हृदयनाथ गावडे, श्री. चौधरी, विनोद सातार्डेकर, सायली म्हाडगुत यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका सौ. शर्वरी सावंत, केंद्रप्रमुख नारायण देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्मेश मसुरेकर, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत, जि. प. सदस्य सरोज परब, प. स. सदस्या गायत्री ठाकूर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर यांनी विशेष अभिनंदन केले.
प्रत्येक तालुक्यातुन निवड झालेल्या सातवीतील ३ विद्यार्थांना विमानाने इस्रोची सहल करायला मिळणार आहे. तसेच चौथीमधुन प्रत्येक तालुक्यातील तीन विद्यार्थांना गोवा विज्ञान संशोधन केंद्र सहल अनुभवायला मिळणार आहे.

25

4