Tuesday, December 10, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावेंगुर्ल्यातील पशुवैद्यकीय लोकार्पणाचा मुद्दा ठरला वादाचा...

वेंगुर्ल्यातील पशुवैद्यकीय लोकार्पणाचा मुद्दा ठरला वादाचा…

रिक्त पदे,तसेच अनेक समस्या असताना उद्घाटन झालेच कसे;शेतकऱ्यांचा सवाल…

वेगुर्ला ता २२:  अनेक पदे रिक्त असताना तालुक्यातील लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय आणि पशु वैदयकीय दवाखान्याचे लोकार्पण घाईगडबडीत उरकण्यात आले. मात्र यावेळी स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता हा कार्यक्रम करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.या चिकित्सालयाचे उद्घाटन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले.त्यामुळे हा मुद्दा कळीचा ठरला आहे
येथील तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयासाठी २०१३-१४ साली ९१ लाख ६७ हजार ७७६ रुपये मंजुर झाले होते. त्यानंतर १ कोटी १९ लाख ५० हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली होती. तर तांत्रिक मान्यता ९९ लाख ८८ हजारच्या खर्चास मिळाली होती. आज या चिकित्सालयाच्या इमारतीस काहि ठिकाणी गळती आहे. इमारती भोवती संरक्षक भित पुर्ण नाही, लोकार्पण कार्यक्रमावेळी लागणारी कोनशिला कार्यक्रम झाला तरी बसवलेली नाही, जनावरे पाडण्यासाठी पीच आदी कामे सार्वजनिक बांधकाम खात्याकडुन गेल्या पाच वर्षात केली गेलेली नाहीत. तसेच या पशु चिकित्सालयातील दोन पशुधन विकास अधिकारी पदे, एक सहाय्यक आयुक्त पद, एक क्लार्क, व इतर पदे रिक्त आहेत. येथील डॉ. मृणाल वरठी यांच्याकडे सद्या साहाय्यक आयुक्त, तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी पद व वेतोरेचे पशुधन विस्तार अधिकारी अशा तीन पदांचा कार्यभार आहे. म्हापण, वेतोरे, शिरोडा पशुधन विकास अधिकारी पदे रिक्त आहेत. वेंगुर्ले श्रेणी एक चे चार व श्रेणी दोन चे दोन मिळून एकुण सहा पशु दवाखाने आहेत. तेथेहि पदे रिक्त आहेत.  या पशु चिकित्सालयात मोठया जनावरांसाठी म्हणजे गाई, म्हैशी यांच्यासाठी लागणारी औषधे काहि प्रमाणात आहेत. मात्र कुत्रा, मांजर वगैरे छोटया पाळीव प्राण्यांसाठी लागणारी औषधे नाहित. ती बाहेरुन शेतकऱ्यांना आणावी लागतात. अशी सारी दुरावस्था असताना नुकताच या पशुचिकित्सालयाचा लोकार्पण सोहळा घाई गडबडीत उरकण्यात आला. या लोकार्पण सोहळयाचे निमंत्रण काही मोजक्याच पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या लोकार्पण सोहळया वेळी प्रश्न उपस्थित करणार म्हणून कार्यक्रमाचे निमंत्रण पत्रकारांना देण्यात आले नाही. या संदर्भात लोकांच्या तक्रारी आल्यानंतर तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. मृणाल वरठी यांची भेट घेतली असता त्यांनी आपण येथे नविन आहे. या कार्यक्रमाची पुर्वकल्पना आपणास आदल्या दिवशी संध्याकाळी देण्यात आली. त्यामुळे निमंत्रणे छापुन आपण काहि पदाधिकाऱ्यांना दिली असल्याचे सांगून त्यांनी आपली बाजू मारुन नेली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments