वेंगुर्ले ता.२३: तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टीच्या वतीने महिला भगिनींना रोजगाराची साधने उपलब्ध करून देवुन अनोख्या पध्दतीने साजरा केला.
तालुका भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेश चिटनीस राजन तेली यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ले शहर, म्हापण व मठ येथे महीलांसाठी मोफत फॅशन डिझाईन कोर्सचे आयोजन करण्यात आले.
वेंगुर्ले शहरातील स्वामिनी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या फॅशन डिझाईन कोर्सच्या समारोप प्रसंगी भाजपा प्रदेश चिटनीस राजन तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रशिक्षणार्थी महीलांसोबत केक कापून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , जिल्हा चिटनीस साईप्रसाद नाईक , शहर अध्यक्ष सुषमा खानोलकर , जेष्ठ नेते बाळा सावंत , उमा फॅशन इनस्टीस्टुसच्या सौ उमा म्हारदळकर , नगरसेविका श्रेया मयेकर , नगरसेविका साक्षी पेडणेकर , इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा व्रुंदा गवंडळकर , नगरसेवक धर्मराज कांबळी , अल्पसंख्याक महिला मोर्चाच्या हसीना बेन मकानदार , जेष्ठ कार्यकर्त्या कीर्ती मंगल भगत , मच्छिमार नेते दादा केळुसकर , युवा मोर्चाचे हर्षद राऊळ ,उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर , पिंटू क्लासेसचे पिंटू नाईक , अल्पसंख्याक सेलचे अब्दुलरहेमान शेख , मेहबूबशहा मकानदार , सैनिक पतसंस्थेच्या ज्योती देसाई व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
प्रशिक्षणार्थी महीलांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई यांनी केले .
वेंगुर्लेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस उत्साहात…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES