संजय देसाई;१५ ऑगस्ट पूर्वी कार्यवाही करा,अन्यथा आंदोलन…
दोडामार्ग ता.२३: कोलझर उपकेंद्रातील अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे त्याठिकाणी असलेल्या डॉक्टरांना २४ तास ड्यूटी करावी लागत आहे.परिणामी त्यांना होणारा मानसिक त्रास लक्षात घेता ही पदे १५ ऑगस्ट पूर्वी भरण्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्यात यावे,अन्यथा आंदोलन करू असा इशारा दोडामार्ग येथील सामाजिक कार्यकर्ते संजय देसाई यांनी दिला आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण नऊ पदे रिक्त आहेत.त्यात आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,आरोग्य सहायिका परिचर,स्त्री परिचर अशा पदांचा समावेश आहे.ही पदे रिक्त असल्यामुळे त्याचा ताण अन्य कर्मचाऱ्यांवर पडत आहे.तसेच पंचक्रोशीतील लोकांना सुविधा मिळताना अनेक समस्या जाणवत आहे.त्यामुळे ही पदे तात्काळ भरण्यात यावी अन्यथा आंदोलन करावे लागेल असे देसाई यांनी दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.