वेंगुर्लेतील श्री देव रामेश्वराच्या हरीनाम सप्ताहात गेली ५० वर्षे भजन सेवा

351
2
Google search engine
Google search engine
Google search engine

शिरोडा बागायतवाडी भजन मंडळाचा सत्कार

वेंगुर्ले  ता.२३: येथील प्रसिध्द श्री देव रामेश्वर मंदिरातील हरिनाम सप्ताहामध्ये सलग गेली ५० वर्षे आपला भजनी मेळा येऊन भजनसेवा तालुक्यातील शिरोडा बागायतवाडी भजन मंडळ सादर करीत आहे. या अखंडीत सेवा करणाऱ्या भजन मंडळातील जेष्ठ भजनीसाथी ‘होय’ या नावाने प्रसीध्द असलेले बाबी शेट्ये व विजय पडवळ यांचा सत्कार देवस्थान समितीतर्फे करण्यात आला.
बागायतवाडी भजन मंडळ अनेक गावातील हरीनाम सप्ताहांमध्ये जाऊन आपली भजनाची सेवा बजावत आहे. वेंगुर्ले येथील रामेश्वर मंदिराबरोबर तालुक्यातील अनेक मंदिरांचा समावेश आहे. पुर्वीच्या जेष्ठ मंडळींनी रामेश्वर मंदिरात •ाजन सादर करण्याचे हे सेवेचे व्रत घेतले आहे. ते आजही तेवढ्याच भक्तिभावाने केले जात आहे. या भजनीमंडळात गावातील आजूबाजूचे भजनप्रेमीही आवडीने सहभागी होत असतात. वेंगुर्लेतील भजन पहाण्यासाठी भाविकांचीही गर्दी असते. दरम्यान सध्या सुरु असलेल्या या भजनी सप्ताहात काल शिरोडा बागायतवाडी भजन मंडळाने भजन सादर केले. त्या भजन कार्यक्रमादरम्यान गेली ५० वर्षे ही सेवा बजावणाऱ्या या भजनी मंडळाचा वेंगुर्ले श्री देव रामेश्वर देवस्थान समिती व मानकरी रवी परब, दाजी परब व सुनिल परब यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.

\