सावंतवाडी बाजारपेठेत दुचाकीने घेतला पेट…

2

शॉर्टसर्किटमुळे प्रकार; आगीवर नियंत्रण मिळाल्याने दुर्घटना टळली…

सावंतवाडी ता. ०५: शॉर्ट सर्किट होऊन भर बाजारपेठेत दुचाकीने पेट घेतला. ही घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास येथील आरपीडी कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर घडली. वेळीच आगीवर पाणी मारून नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र दुचाकीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित दुचाकीमध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक धूर येऊ लागला. तर काही वेळातच दुचाकीच्या समोरील वायरिंग ने पेट घेतला. यावेळी परिसरातील नागरिकांनी धावाधाव करत पाणी मारून आग विझविली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र दुचाकीचे काहीशा प्रमाणात नुकसान झाले आहे.

587

4