मालवण येथील क्रिकेट स्पर्धेत सावंतवाडीच्या एम क्रिकेट अकादमी संघाचे यश…

2

बांदा ता. ०५: सावंतवाडी एम क्रिकेट अकादमीच्या १५ वर्षाखालील संघाने मालवण येथे आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात सांगलीच्या पोलाईट क्रिकेट क्लबवर मात करत विजेतेपद मिळविले. मालवण येथील टोपीवाला प्रशाळेच्या मैदानावर ही स्पर्धा भरविण्यात आली होती. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सांगली संघाने निर्धारित १९ षटकात सर्वगडी बाद ८२ धावा केल्या. सर्वेश बिडकर याने ६३ चेंडूत ३४ धावा केल्या. एम क्रिकेट अकादमी सावंतवाडीचे गोलंदाज सुहान बांदेकर याने ३, साहिल नाटलेकर व निशांत शेटकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केलेत. सावंतवाडी संघाने १४ षटकातच २ गडी गमावून लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. इशांत कुबडे याने ३४ धावा केल्या तर आर्यन दुधवडकर याने नाबाद २३ धावांचे योगदान दिले. पारितोषिक वितरण अकादमीचे अध्यक्ष अक्रम खान व सांगली क्लबचे श्री पडीमार यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज ईशान कुबडे, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सुहान बांदेकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मंथन नाईक यांची तर मालिकावीर म्हणून सांगली संघाच्या सर्वेश बिडकर याची निवड करण्यात आली.

123

4