सावंतवाडी मदर क्वीन इंग्लिश स्कूलच्या विभव राऊळचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश…

2

सावंतवाडी ता. ०५: येथील मदर क्वीन इंग्लिश स्कूलचा विध्यार्थी विभव विरेश राऊळ याने शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. त्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून इंग्रजी माध्यमामधून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यात त्याला ८५.२३ टक्के गुण मिळाले असून, तो शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातवा व सावंतवाडी तालुक्यात दुसरा आला आहे.
त्याला त्याचे वडील वकील विरेश राऊळ, आई सरकारी वकील वेदिका राऊळ तसेच मुख्याध्यापिका साळगावकर मॅडम, वर्ग शिक्षिका नार्वेकर मॅडम,सना मॅडम,भोसले मॅडम, चव्हाण सर तसेच शाळेतील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. विभव राऊळचे संस्था अध्यक्ष राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखंमराजे भोसले यांनी अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे. विभव हा बुद्धिबळ खेळातील राष्ट्रीय खेळाडू असून, त्याने वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धामध्येही यश मिळवले आहे.

51

4