सावंतवाडीच्या रोजगार मेळाव्यात ७०० जणांना नोकऱ्या…

2

कुडाळात लवकरच दुसरा मेळावा घेणार; हर्षवर्धन साबळेंची माहिती…

सावंतवाडी ता. ०५: ऍडमिशन, व्हेरेनियम क्लाऊड आणि सिक्युअर क्रेडिशियल्स या कंपनीच्या माध्यमातून सावंतवाडीत आज घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात ७०० उमेदवारांना नोक-यांची नियुक्तीपत्रे देण्यात आली. या मेळाव्यात दोन हजारहून अधिक युवक-युवती सहभागी झाले होते. दरम्यान कुडाळमध्ये लवकरच चाळीसहून अधिक कंपन्यांचा पुन्हा एकदा रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीचे संचालक हर्षवर्धन साबळे यांनी दिली.
या रोजगार मेळाव्यात एअरटेल, अमित इलेक्ट्रिक वर्क्स, ऑटो क्राफ्ट, भगीरथ इंटरप्राइजेस, दीप प्लम्बिंग वर्क, युरेका फोर्ब्स, होम रिवाईज एज्युकेशन, हॉटेल नीलम कंट्रीसाईड, हॉटेल स्पाइस कोकण, हॉटेल अप्पर डेक, इनफ्रीपी आयटी सर्व्हिसेस, जैतापकर ऑटोमोबाईल, मार्कसन फार्मा, माया एचआर सोल्युशन, नेक्स्ट स्टॉप टेक्नोलॉजी, वन रिअलअर सिव्हिल, पेटीएम, क्वेस कॉर्पोरेशन, साई प्लम्बिंग वर्क, साई ट्रेडर्स, सिक्योर क्रेडेंशियल्स, टेरमेरिक लाईफ स्टाइल, व्हॅरेनियम क्लाउड, उन्मेष फॅब्रिकेशन, वृषाली ऑटो केअर या पुणे, गोवा, कोल्हापूर येथील प्रमुख कंपन्या तसेच स्थानिक कंपन्या सामील झाल्या होत्या .
या मेळाव्यात बॅक ऑफिस, सॉफ्टवेअर डेव्हलपर, मेकॅनिक्स, डाटा ऑपरेटर, सेल्स एक्सिक्युटीव्ह, आयटी, एज्युकेशन, टेक्निशियन, हॉटेल सर्व्हिसेस या क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध युवक-युवतीन्ना मिळाल्या आहेत.
अगदी सकाळपासून युवक-युवतीन्नी या मेळाव्याला मोठी गर्दी केली होती.रजिस्टर फॉर्म घेण्यासाठी देखील तरुणांची झुंबड बघायला मिळाली.ज्या युवक युवतीन्ना नोकरी प्राप्त झाली त्यांचे आयोजकांकडून अभिनंदन करण्यात आले तर ज्यांना नोकरीं मिळाली नाही त्यांनी देखील नाराज होऊ नये, त्यांचा डेटा आयोजकांकडून सेव करण्यात आलेला असून त्यांना देखील भविष्य काळात जश्या वेकन्सीस उपलब्ध होतील तसा संपर्क करण्यात येईल असे आव्हाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे झालेल्या यां रोजगार मेळाव्यातून तरुण तरुणीची गर्दी तसेच नोकरीं प्राप्तीसाठीची धडपड लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व युवक-युवतींसाठी पुन्हा एकदा असाच भव्य मेळावा कुडाळ शहरात घेऊ, असे आश्वासन श्री. साबळे यांनी दिले आहे.

935

4