उदय जांभवडेकर यांची भाजयुमो प्रदेश सदस्यपदी निवड

212
2

सिंधुदुर्गनगरी ता,२३: भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्यपदी येथील उदयकुमार हरिश्चंद्र जांभवडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष आ योगेश टिळेकर यांनी ही नियुक्ती केली आहे.
मुंबई येथील भाजप कार्यालयात आ टिळेकर यांनी हे नियुक्तिपत्र दिले. यावेळी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रभारी संजय कोटगे, जिल्हा प्रभारी अरुणा पाटकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश सदस्य अतुल काळसेकर, राजन तेली, युवा नेते संदेश पारकर, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत यावेळी उपस्थित होते.

4