सिंधुदुर्गनगरी , ता. २३ : शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते नागेंद्र परब यांचा वाढदिवस आज कार्यकर्त्यांच्यावतीने जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावेळी परब यांना उपस्थितांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. येथील खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ. जान्हवी सावंत, ओरोस उपसरपंच मनस्वी परब, माजी सभापती तथा मालवण उपतालुकाप्रमुख प्रसाद मोरजकर, आशिष परब, खासदार सचिव सोमा घाडिगावकर, नागेश तोरसकर, योगेश तावडे, पंचायत समिती सदस्य जयभारत पालव, छोटू पारकर, युवासेना विभागप्रमुख अमित भोगले, वैभव परब, बाळा भोसले, अरुण राणे, भगवान परब, सुशिल निब्रे, प्रताप साईल, मनिष बोभाटे, कुलवंत वारंग, युवासेना शहरप्रमुख सागर परब, रोशन परब, योगेश्वर राऊत, सोनल पालव, संतोष परब, गणेश तावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.