माणगावमध्ये दोन दुचाकींमध्ये अपघात ; दोघे जखमी

2

माणगाव / मिलिंद धुरी, ता. २३ : येथील दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज साडे बारा वाजण्याच्या सुमारास माणगाव चर्चसमोर घडला. अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. संतोष घाडी (वय 48. रा. नानेली) व शिवराम सरनोबत (वय 65, रा. नारुर) अशी त्यांची नावे आहेत.
त्यांच्यावर आंबेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली व जखमींना सहकार्य केले.

13

4