_…चक्क! रस्त्यावरच केली भात लागवड_

2

_नावळे हुंबरवणेवाडी येथे अतिक्रमण; रस्ता खुला करण्याची ग्रामस्थांची मागणी_

वैभववाडी ता,२३: नावळे धनगरवाडा येथील मुख्य रस्ता ते हुंबरवणेवाडी रस्त्यावर मूळ जमिन मालकाने काटेरी कुंपण करून त्याठिकाणी भात लागवड केली आहे. त्यामुळे या वाडीतील ग्रामस्थांचा मार्ग बंद झाला आहे. तरी ग्रा. पं. ने लवकरच रस्ता खुला करावा. अन्यथा आंदोलन करण्यात येईल. असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
रविवारी संध्याकाळी मूळ जमिन मालक चंद्रकांत तुकाराम मठकर, शिवाजी तुकाराम मठकर, राजेश महादेव मठकर, रूपेश शिवाजी मठकर या बंधूनी संगनमतांनी ग्रा. पं. च्या मालकीच्या मुख्य रस्त्यावर काटेरी कुंपन करून याठिकाणी भात लागवड केली आहे. त्यामुळे या वाडीतील ग्रामस्थांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला आहे.
सदरील रस्ता खुला करून देण्यासाठी येथील ग्रामस्थ तानाजी गुरव, पांडुरंग गुरखे, बाळकृष्ण गुरव, चिंचू झोरे, लक्ष्मण शेळके, विष्णू गुरव, कोंडू गुरखे, भगवान गुरखे आदींनी ग्रा. पं. कडे तक्रार दिली आहे. यावेळी ग्रा. पं. ने संबंधित मालकाला तात्काळ नोटीस काढून येत्या पाच दिवसात रस्ता खुला करून देतो असे तोंडी आश्वासन दिले.

1

4