घुमडेत श्रावणधारा २०१९ अतंर्गत जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

164
2
Google search engine
Google search engine

घुमडे ग्रामस्थ मंडळाचे आयोजन

मालवण, ता. २३ : तालुक्यातील घुमडे येथील श्रीदेवी घुमडाई मंदिर येथे श्रावणधारा २०१९ तंर्गत गुरुवर्य भजनसम्राट कै. पंढरीनाथ घाडीगावकर बुवा यांच्या स्मरणार्थ उद्योजक दत्ता सामंत पुरस्कृत जिल्हास्तरीय नामांकित बुवांची भजन स्पर्धा ६ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती घुमडे ग्रामस्थ मंडळाचे सचिव भाऊ सामंत यांनी दिली.
श्रावण महिन्यात घुमडे ग्रामस्थ मंडळाच्यावतीने गेली पाच वर्षे भजन स्पर्धा घेण्यात येत आहे. यावर्षीही जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणातील प्रत्येक मंगळवारी ही भजनस्पर्धा होईल. जिल्ह्यातील इच्छुक भजनसंघांनी आपली नावे ५०० रुपये सहित योगेश सामंत मोबा- ९०४९४८४७३२, भाऊ सामंत मोबा- ९४२३८०६२९८, बाळा माने मोबा-८५८८१३५१००, ७५०७५२०१०० यांच्याकडे २७ जुलैपर्यंत नोंदवावीत असे आवाहन घुमडे ग्रामस्थ मंडळाच्यावतीने केले आहे.