मालवणात ९, १० ऑगस्टला सौ. विंदा जोशी वक्तृत्व स्पर्धा

2

मालवण, ता. २३ : येथील नगर वाचन मंदिरच्यावतीने सौ. विंदा जोशी स्मृती वक्तृत्व स्पर्धा ९ व १० ऑगस्टला ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित केली आहे.
यामध्ये ९ ऑगस्टला सकाळी १० वाजता इयत्ता पाचवी ते सातवी या तालुकास्तरीय गटाची स्पर्धा होणार आहे. या गटासाठी माझा आवडता छंद, पाणी हेच जीवन, माझे आवडते पुस्तक हे विषय आहेत. तर १० रोजी सकाळी १० वाजता जिल्हास्तरीय इयत्ता आठवी ते दहावी या गटाची स्पर्धा होणार आहे. यासाठी ग्लोबल वॉर्मिंग, सर्जिकल स्ट्राईक – योग्य की अयोग्य, पु.ल. एक साठवण हे विषय देण्यात आले आहेत. दोन्ही गटातील विजेत्यांना १० ऑगस्टला स्पर्धा संपल्यानंतर रोख रक्कम, पारितोषिके व प्रशस्तिपत्रके देण्यात येणार आहेत. इच्छुक स्पर्धकांनी १ ऑगस्टपर्यंत दुपारी १२ वाजेपर्यंत नावे नोंदवावीत, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष उदय मोरे व कार्यवाह नागेश कदम यांनी केले आहे.

15

4