सावंतवाडी आगारातील महिला वाहक बेपत्ता

10804
2

सावंतवाडी, ता. २३ : येथील एसटी आगारात कार्यरत असलेली विवाहित महिला वाहक बेपत्ता झाली आहे. सारिका भरत म्हाडगूत (वय 28, रा. कलंबिस्त) असे तिचे नाव आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात तिचे पती शशांक केळेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पतीने दिलेली अधिक माहिती अशी : सारिका ही काल सकाळी नऊ वाजता नेहमीप्रमाणे कामावर जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. मात्र ती कामावर गेली नाही. तसेच आज सकाळपर्यंत घरी पोहोचली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध केली. परंतू ती मिळून न आल्याने आज सावंतवाडी पोलिस ठाण्यात बेपत्ताची फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्या बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती ठाणे अंमलदार सुरेखा कदम यांनी दिली.

4