कणकवलीतून विवाहित तरुण बेपत्ता

2

कणकवली, ता. २३ : शहरातील बांधकरवाडी येथील सुनील सुधीर पवार (वय 32) विवाहित तरुण काल 22 जुलैपासून बेपत्ता झाला आहे. याबाबतची खबर त्याची पत्नी गौरी हिने आज कणकवली पोलिसांत दिली. बेपत्ता सुधीर पवार हा डंपर व्यावसायिक आहे. तो बांधकरवाडी येथे आपली पत्नी आणि मुलांसह गेली काही वर्षे वास्तव्यास आहे. 22 जुलै रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास सुनील हा घरातून कुणासही काही न सांगता बाहेर पडला. त्यानंतर तो अद्याप घरी परतलेला नाही. त्यामुळे तो बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या पत्नीने आज पोलिसांत दिली.

4