राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्गात आरोग्य व रोगनिदान शिबीर

2

दोडामार्ग, ता. २३ : भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दोडामार्ग तालुक्यात आरोग्य व रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी दिली. हे शिबीर गुरूवार ता. 25 रोजी साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्र, रविवार ता. 28 जुलैला ग्रामीण रुग्णालय तर बुधवारी ता. 31 ला तळकट प्राथमिक आरोग्य केंद्रात होणार आहे. यावेळी नेत्रतपासणी, मधुमेह तपासणी, हृदयविकार निदान आदी तपासण्या करण्यात येणार आहेत. या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन दोडामार्ग भाजपच्यावतीने करण्यात आले आहे.

16

4