जिल्हा माहिती अधिकारी मिलींद बांदिवडेकर यांना निरोप

2

सिंधुदुर्ग, ता. २३ : जिल्हा माहिती अधिकारी मिलींद बांदिवडेकर यांना आज कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्यावतीने निरोप देण्यात आला. श्री. बांदिवडेकर हे वयोमानानुसार 31 जुलैला निवृत्त होत आहेत.
यावेळी सांगलीच्या जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, कोल्हापूरचे प्रशांत सातपुते, विशेष कार्यकारी अधिकारी सखाराम माने व कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालय व सिंधुदुर्ग माहिती कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी अष्टपुत्रे यांनी श्री. बांदिवडेकर यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, बांदिवडेकर यांचे व्यक्तीमत्व नेहमी उत्साही होते. त्यांच्यासोबत काम करण्याची मजा वेगळीच होती. एखादे काम सहजरितीने परिपूर्ण करणे ही त्यांची कसब होती. यापुढेसुद्धा त्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळो.

4