दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 140 मि.मी पावसाची नोंद

2

सिंधुदुर्गनगरी, ता. २३ : जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात 140 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 69.75 मि.मी पावसाची नोंद झाली असून 1 जून 2019 ते आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी 1826.40 मि.मी पाऊस झाला आहे. तालुका निहाय चोवीस तासात झालेला पाऊस पुढील प्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग 140 (2022), सावंतवाडी 72 (1523), वेंगुर्ला 29.02 (2182.26), कुडाळ 41 (1712), मालवण 33 (1550), कणकवली 88 (2060), देवगड 85 (1521), वैभववाडी 70 (2041) पाऊस झाला आहे.

1

4