स्वाभिमानचे लोकसभा मतदार संघ उपाध्यक्ष बाबा परब यांना पितृशोक

261
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. २३ : शहरातील बाजारपेठेतील जुन्या पिढीतील व्यापारी मधुकर शंकर परब (वय-९०, रा. रेवतळे मालवण) यांचे वृद्धापकाळाने आज राहत्या घरी निधन झाले.
शहरातील भंडारी हायस्कूल हॉल नजिक परब यांचे किराणा मालाचे दुकान होते. होमगार्ड विभागातही त्यांनी काम केले होते. मालवणात महिला होमगार्ड पथकाची स्थापना मधुकर परब यांनी केली होती. १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीच्या स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात ते नेहमी हिरीरीने पुढाकार घेत. तहसील कार्यालयातून ध्वज संचलनासाठी आवर्जून त्यांना निमंत्रित केले जात होते. गेले काही दिवस ते वाढत्या वयोमानामुळे अस्वस्थ होते. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, तीन सुना, भाऊ, मामी, नातवंडे असा परिवार आहे.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे लोकसभा मतदार संघ युवक उपाध्यक्ष बाबा परब तसेच वेंगुर्ला नगरपालिकेतील वरिष्ठ लिपिक पप्पू परब यांचे ते वडील होत. सायंकाळी रेवतळे स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

\