पूर्वा गावडे हिचा क्रीडा विभागाने केला सत्कार

2

सिंधुदुर्गनगरी ता,२४: महाराष्ट्र शासनाकडून राष्ट्रिय स्तर जलतरण प्रशिक्षणासाठी पूर्वा संदीप गावडे हिची क्रिडा प्रबोधीनी पुणे येथे निवड झाल्याबद्दल तीचा जिल्हा क्रिडा विभागाच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच ती शिक्षण घेत असलेल्या पणदुर हायस्कूलच्यावतीनेही तीचा सत्कार करण्यात येवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पूर्वा गावडे ही आठ वर्षाची असल्यापासून सिंधुदुर्गनगरी येथील जलतरण तलावामध्ये प्रशिक्षण घेत विविध जलतरण स्पर्धांमध्ये भाग घेतला होता व राज्यस्तरापर्यंत पोहोचली होती. त्यानंतर शासनाच्या पुणे येथील क्रिडा प्रबोधीनी मार्फत जून मध्ये झालेल्या निवड चाचणीमध्ये ती राष्ट्रियस्तर जलतरण प्रशिक्षणासाठी पात्र ठरली आहे. राष्ट्रियस्तर जलतरण प्रशिक्षणासाठी पात्र ठरल्याबद्दल जिल्हा क्रिडा विभागाच्यावतीने जिल्हा क्रिडा अधिकारी किरण बोरवडेकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवून पूर्वा हिचा सत्कार करण्यात आला. तसेच क्रिडा विभागाच्यावतीने आवश्यकते सहकार्य केले जाईल असे स्पष्ट करण्यात आले. तसेच पूर्वा ही क्रिडा प्रबोधीनीसाठी निवड होणारी जिल्ह्यातील पहिली खेळाडू असून ही जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे गौरोदगार क्रिडा अधिकाऱ्यांनी काढले. यावेळी मनिषा पाटिल, स्वप्निल देवळेकर, अधिकारी कर्मचारी आदि उपस्थित होते.
वेताळबांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शिवाजी न्यू इंग्लिश स्कुलच्यावतीनेही पूर्वाचा सत्कार करण्यात आला. पणदूर हायस्कूलची एक विद्यार्थीनी कमी होत असली तरी क्रिडा प्रबोधीनीसाठी आपल्या विद्यार्थीनीची निवड होणे हे आपल्यासाठी अभिमानस्पद असल्याचे गौरोदगार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शशिकांत अणावकर यांनी काढले. यावेळी संस्थेचे पदधिकारी, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

53

4