वसई-विरार महानगरपालिका मधील प्रशासकीय अधिकारी नक्की कोणासाठी काम करतात ?

2

मुंबई/अजित जाधव ता.२४: प्रभाग ‘ड’ मधील फायर ब्रिग्रेडच्या समोरच्या बिल्डिंग समोर एका दुकानदाराने कोणतीही परवानगी न घेता अनधिकृत शेड बांधलले आहे. व ते शेड सर्व बाजूने बंद केले आहे. त्यामुळे लोकांना तसेच आजूबाजूच्या दुकानदारांना त्रास होत आहे.
संबंधित शेड बांधताना तोंडी महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. रीतसर अर्ज देऊन त्याची प्रत तुळींज पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. ज्या दुकानदाराने अर्ज केला त्यांनी ६ जुलै व ८ जुलै ला जाऊन पुन्हा कारवाई का केली नाही म्हणून विचारणा केली तर उडवा उडवीची उत्तर देण्यात आली.
आज पुन्हा ते दुकानदार महानगर पालिकेचे अधिकारी श्री. राठोड यांना भेटले. तर पुन्हा त्यांनी तेच उत्तर दिले. व उद्या पाहू आता आमच्याकडे कामगार नाहीत. असे सांगितले.
याबाबत श्री. राठोड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, मला येथे येवून दोन दिवस झाले आहेत. माझ्याकडे अर्ज आला नसल्याचे त्यांनी सांगितले.
विनापरवानगी शेड महानगर पालिकेचे अधिकारी अर्ज करूनही पाठपुरावा का करत नाहीत. प्रभाग ‘ड’ चे सहाय्यक आयुक्त दीपक म्हात्रे काय करतात. असा सवाल उपस्थित केला जात आहे.

17

4