घरात आढळला वृद्धाचा मृतदेह | चिंदर पालकरवाडीतील घटना ; मृत्यूचे कारण अस्पष्ट

2

आचरा, ता. २४ : चिंदर पालकरवाडी कोणी येथील दिलिप दत्ताराम सांडव (वय-६७) यांचा मृतदेह त्यांच्या घरात शयनगृहात सोमवारी सायंकाळी मृतावस्थेत आढळून आला. घरबंद असल्याने आचरा पोलिसांना गॅलरीचा दरवाजा तोडून मृतदेह ताब्यात घ्यावा लागला. मृत्यू मागचे कारण स्पष्ट होवू शकले नाही.
दिलिप सांडव यांचे कुटुंब मुंबईला असल्याने सध्या ते चिंदर पालकरवाडी कोण येथील आपल्या घरात एकटेच राहत होते. चिंदर ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी सांडव यांचे त्यांच्या पत्नीशी फोनवरून बोलणे झाले होते. रविवारी सांडव यांच्या पत्नीने केलेला फोन त्यांनी उचलला नव्हता. सोमवारी पण फोन उचलत नसल्याने सांडव यांच्या पत्नीने लब्देवाडीतील नातेवाईकांना फोन करून दिपक सांडव यांची माहिती काढण्यास सांगितले. यावेळी संबंधित नातेवाईकाने घरी जाऊन पाहिले असता घर बंद असून दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले.
याबाबतची खबर आचरा पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर, हेड कॉन्स्टेबल बाबू देसाई, अक्षय धेंडे, श्री. कांबळी आदींनी घटनास्थळी भेट दिली. घर बंद असल्याने घराची खिडकी उघडून बघितले असता दुर्गंधी येत असल्याचे दिसून आले. याबाबत दिलिप सांडव यांच्या मुलाशी फोन वरून संपर्क साधल्यावर गॅलरीचा दरवाजा तोडून आत जाण्यास सांगितले. दरवाजा तोडून आत गेल्यावर सांडव यांचा मृतदेह बेडवर मृतावस्थेत आढळून आला. याबाबत आचरा पोलिस स्टेशनला आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्यापूर्वी घडल्याची शक्यता आचरा पोलिसांनी व्यक्त केली.
मृत्यू मागचे नेमक कारण स्पष्ट झाले नाही.

17

4