मळेवाडच्या नम्रता राऊतांचे “सी.ए” परीक्षेत यश…

6
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१४: मळेवाड येथील नम्रता महेंद्र राऊत यांनी सनदी लेखापाल (सी.ए) परीक्षेत उत्तीर्ण होत विशेष प्राविण्य मिळविले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.

सनदी लेखापाल (सी.ए) परीक्षेचा नुकताच निकाल जाहिर झाला. यात सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड हेदुलवाडी येथील मधुसुधन राऊत यांची सून नम्रता यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. उल्लेखनीय गोष्ट अशी की नोकरी आणि संसार ही दुहेरी जबाबदारी सांभाळत नम्रता ह्या चार्टर्ड अकाऊंटंट सारखी अतिकठीण श्रेणीत मोडणारी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. त्या सद्यस्थितीत नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.