_मुंबईत ‘कोसळधारा’….._

173
2

_रेल्वे सेवा विस्कळीत; येत्या २४ तासात मुसळधार पावसाचा अंदाज_

मुंबई ता,२४: गेले आठ दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी मध्य रात्रीपासून मुंबईसह उपनगरात पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. रात्रीपासून पावसाचा जोर कायम असल्यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. त्यामुळे मंदवली वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
मुंबईसह कोकणात आठवडा भराच्या विश्रांतीनंतर मंगळवारी मध्यरात्री पासून पावसाने जोरदार बॕटींग केली आहे. त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. मालाड व गोरेगाव हायवेवर पाणी भरल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. लोकल धिम्या गतीने सुरू आहे. मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर कायम असून दि. २६ जुलैला अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

4