स्वतःच्या घरी चोरी करणारा मुलगा कर्जत येथून ताब्यात

2

फोंडाघाट येथील घटना:अडीच लाखाची रक्कम केली होती लंपास

कणकवली, ता,२४: स्वतःच्या घरातील 2 लाख 40 हजाराची रोख रक्कम व इतर ऐवज लंपास करणार्‍या युवकाला कणकवली पोलिसांनी कर्जत येथून ताब्यात घेतले आहे. या चोरीबाबत त्या मुलाच्या पित्यानेच कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. चोरी करून हा मुलगा रेल्वेने मुंबईला पळाला होता.
फोंडाघाट खैराटेवाडी येथील पांडुरंग खरात हे भात लावणीच्या कामासाठी शेताकडे गेले असताना त्यांचा मोठा मुलगा लक्ष्मण (वय 19) हा घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने तसेच सर्व बँक पुस्तके, घरातील सर्वांची आधारकार्ड घेऊन चार दिवसापूर्वी पसार झाला होता. तशी खबर पांडुरंग खरात यांनी दिली होती. या तक्रारीमध्ये मे महिन्यात लक्ष्मण याने त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी जमा केलेले 1 लाख 70 हजार रूपये घेऊन घरातून पोबारा केल्याचे नमूद केले होते. लक्ष्मण याला काल (ता.23) कर्जत येथून कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

28

4