माणगाव/मिलिंद धुरी,ता.२४ : कुडाळ तालुक्यातील वाडोस ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच पदी योगेश बेळणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माणगाव खोऱ्यात या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू होती.
यात स्वाभिमान-भाजप राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी यामध्ये स्वाभिमान ४, भाजप १, राष्ट्रवादी १ तर शिवसेनेकडे ३ जागा होत्या. ३ सदस्य असूनही शिवसेना उमेदवाराला उमेदवारी फॉर्म पण भरता आला नाही.
यावेळी स्वाभिमान युवक सरचिटणीस विशाल परब,सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक प्रकाश मौर्य,घावनळे विभागीय अध्यक्ष राजा धुरी,राष्ट्रवादी काँग्रेसचे आर के सावंत,प्रदीप सावंत, दिनेश म्हाडगुत, संदीप म्हाडगुत,सीताराम काललवणकर आदी व महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.